नेहमीप्रमाणे आज प्रतिक्रिया कि इच्छाशक्ती कशी जागृत करायची. खूप प्रयत्न करून पण का काही करावंसं वाटत नाही? इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग आहे. मग आता हे सगळं समजावून घ्यायचे असेल तर इच्छाशक्ती म्हणजे काय हा माझा पहिला प्रश्न होता. एखादे लक्ष गाठायचे म्हणून त्याकरिता परिश्रम घेणे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते. किती जणांना प्रॉब्लेम आहेत? जवळपास ७०% लोकांना असे वाटते कि उद्या केले तर नाही चालणार का. असं का होतं त्याला काही कारणे आहेत;
१. मोटिवेशन ची कमी. काही गोष्टी आयुष्यात मिळाली नसेल तर पटकन हार मानतो.
२. मनाची एकाग्रता नसणे. चंचलता, काही कारणास्तव विचलित होणे
३. मानसिक स्थिती – आजार, निराशा, चिंता.
४. मार्गदर्शनाचा अभाव. त्यामुळे अर्ध्यातून जे काही करत असतो ते सोडून देणे.
५. काही न करणारी मित्र मंडळी, व्यसन.
६. अपूर्ण निर्णयशक्ती. अडथळा आला तर दुसरा पर्याय न शोधणे.
७. साधनांची कमी. माहितीचा अभाव.
म्हणजेच येणारे अडथळे, अडचणी यावर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती हवी. आता तुम्ही म्हणाल कि हे सगळे करायला इच्छाशक्ती कुठून आणू. काही उपायांनी ही इच्छाशक्ती वाढवता येते. जसे कि;
१. योग्य आहार आणि उपवास – यांचं संतुलन. आपण खाण्यापिण्याची इच्छा मारतो तेव्हा सर्वोच्च पातळीचं स्वनियंत्रण मिळवू शकतो.
२. मनावरचा ताण वाढवणार्या परिस्थितीला सामोरं जाताना थोडा वेळ थांबा. दोन मिनिटं दीर्घश्वसन करा. इच्छाशक्ती वाढल्याचं तुम्हाला जाणवेल.
३. मनाला सतत निर्णयाची जाणीव करून द्या. स्वत:च्या निर्णयावर ठाम राहणे.
४. इच्छाशक्तीवर अपुर्या झोपेचा परिणाम होतो. त्यामुळे सात ते आठ तासांची शांत झोप घेणे.
५. इच्छाशक्तीवर मेंदूचं नियंत्रण असतं. मेडिटेशनमुळे मेंदूला चालना मिळते आणि इच्छाशक्ती प्रबळ होते. संभाव्य अडचणींवर मात करण्यास, तोडगे सुचवण्यास मेंदू सज्ज होतो.
६. चांगले मित्र, मार्गदर्शक बरोबर चर्चा करणे, नियमित पाठपुरावा.
७. मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे.
८. आयुष्यात काही भेटले नाही म्हणून जग संपले असे नाही. नेहमी पुढची संधी असते. सकारात्मक राहा.
९. काय करायचे ते साध्य होणारं असेल तेच करा. चंद्रावर जायला वेळ लागतो.
कालपासून बरेच जण म्हणत आहेत चिनी वस्तू वापरायच्या नाहीत, इच्छा आहे, मग याच गोष्टी भारतात बनवायची इच्छा ठेवा. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो हे चीन किंवा जपान करून दाखवते. प्रत्येकाने ठरवले कि मी शिक्षण घेताना, कुठलेही काम करताना इच्छाशक्तीला गहाण ठेवण्यापेक्षा तिला जागृत केले तर किती छान होईल. मग चीन आपला माल तिकडे विकेल..इतिहास गवाह आहे जो करतो तोच तरतो…तुम्ही ठरवा आपल्याला काय हवे?
@श्रीकांत कुलांगे
98904020209