मानसिक लवचिकता

 

आपण म्हणतो की मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती नाही मग ते कुठलेही क्षेत्र घ्या. रोज मला काहीजण म्हणतात की तुमच्यासारखे लेख रोज वाचतो पण माझी मानसिकता बदलत नाही, मी कुठे कमी पडतोय समजतं नाही. आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे हाताळतो त्याला मानसिकता म्हणूया. त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत – कायमस्वरूपी आणि बदलणारी. कायम स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये, लोकांचे गुणधर्म निश्चित असल्याचे ते मानतात आणि म्हणून बदलू शकत नाहीत. ते विचार करतात, जे आहे ते ठीक. अशा प्रकारची मानसिकता असणारी मंडळी म्हणजेच फिक्स मानसिकता. यांचे काय विचार असतात ते पाहू;
१. चॅलेंज स्वीकार करायला थोडेसे कचरतात.
२. जरी प्रयत्न केले तरी काही अडचण आल्यास सोडून देतात.
३. प्रयत्न करणे म्हणजे डोक्याला त्रास किंवा त्यातून काही निष्पन्न होणार नाही अशी भावना.
४. चुकांपासुन न शिकणे, नजरअंदाज करणे.
५. दुसरे जिंकले तर तो आपल्याला धोका आहे असे मानणे.
यामुळे अशा व्यक्ती बुद्धी असूनही एकाच ठिकाणी राहून जे हवं ते साध्य न झाल्याने नशिबाला दोष देतात.

याविरुद्ध दुसरी बाजू म्हणजे बदलणारी मानसिकतावाली मंडळी. मानसिकदृष्ट्या – एक दृढ आणि सकारात्मक – निरोगी, स्वाभिमान वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणारी. त्यांची संकल्प शक्ती दैनंदिन जीवनामध्ये बोलणे, चालणे, संवाद, आत्मविश्वास यावर नियंत्रण ठेवते. ते नेहमी नाविन्याची कास धरतात, आपल्या बुद्धीचा वापर हेतुपूर्ण करतात. यांचे विचार पाहू:
१. आव्हान स्वीकारायला नेहमी पुढे.
२. अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रचंड धडपड करणे.
३. नेहमी प्रयत्नरत – प्रयत्नांती परमेश्वर हि धारणा.
४. टीका किंवा चुकांपासुन शिकणे व धीर न सोडता पुढे जाणे.
५. जे यशस्वी झालेत त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन, काय वेगळे केली ते पाहून पुढे जातात.

या सवयीचा परिणाम असा होतो की असे लोक यशस्वी तर होतातच पण पुढे जाऊन आपले ध्येय अजून पुढे नेत चिकाटीने साध्य करतात. पण सर्वच बदलणारी मानसिकता सकारात्मक काम करते असे नाही. भरपूर उदाहरणे आपल्या समोर आहेत.
मानसिकता तयार न होणे अथवा व्यवस्थित वापर न कारण त्यासाठी सभोवताल चे वातावरण, घरातील नकारात्मक वडीलधारी मंडळी, न्यूनगंड, सकस आहाराची कमतरता, मानसिक आजार असे अनेक कारणे आहेत.
मानसिकता बदलायची असेल तर; १. संघर्षाला तोंड देण्याची तयारी, २. वेळ व्यवस्थापन, ३. दृष्टीकोन, ४. दूरदृष्टी निर्माण करणे, आणि ५. स्वप्न पाहणे. यशामागील मूळ प्रेरणा असते ती स्वतःची, गुरुची आणि आईवडिलांची.

मानसिकतेला लवचिक ठेवले तर खूप चांगले उद्देश साध्य करू शकतो. जे यशस्वी झाले ते सुद्धा आपल्यासारखेच सर्वसामान्य होते परंतु त्यांनी पाहिलेले स्वप्न त्यांनी वास्तवामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणूनच माजी राष्ट्रपती श्री.अब्दुल कलाम म्हणायचे की स्वप्न पहा.. मित्रानो अजून पण वेळ गेलेली नाही फक्त मनाची तयारी करा.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *