काल आयुष्यात काय उद्देश असावा याबाबत थोडी चर्चा केली होती, आणि पुन्हा अनेक प्रश्न अनेकांच्या फीडबॅक मधून. रेवतीचा मोठा प्रॉब्लेम होता, म्हणाली सर खूप प्रयत्न करतेय पण पहिल्यासारखी बारीक होतं नाहीये. तिचा उद्देश असून, प्रयत्न करून देखील बारीक नाही होऊ शकली म्हणून शल्य. तिच्यामध्ये शरीराविषयी थोडी नकारात्मकता तिला जाणवतेय हे मला लगेच समजलं. शरीर आपलं, लोक काय म्हणतील हा विचार दुसर्यांचा, त्यावर आपला कंट्रोल नाही, मग कशाला चिंता? माझ्या शरीराकडे पाहण्याची माझी दृष्टी महत्वाची. माझं लक्ष मी काय खातो, पितो, व्यायाम करतो किंवा नाही, आरोग्य, पेहराव, चालणं-बोलणं याकडे केंद्रित केले तर कदाचित शरीराकडे पाहण्याचीआपली मनोवृत्ती थोडी सकारात्मक होईल. शारीरिक सकारात्मकतेचा अर्थ असा आहे की आपल्या असलेल्या शरीराचा आनंद घ्या आणि वयोमानाने, गर्भधारणेमुळे किंवा जीवनशैलीच्या निवडीमुळे नैसर्गिकरित्या होत असलेल्या शरीरातील बदलांमुळे वाईट वाटून न घेणे.
ठराविक गोष्टी समजल्या कि शारीरिक सकारात्मता आपल्यात आपोआप येते.
१. त्रुटी असूनही आपल्या शरीराचे कौतुक करणे.
२. आपल्या शरीराबाबत आत्मविश्वास वाटणे.
३. स्वतःवर प्रेम करणे.
४. आपल्या शरीराचे आकार स्वीकारणे – जसं आहे तसं…व्हू केअर्स!!!
शारीरिक सकारात्मकता नाही ठेवली तर काही मानसिक आजार जडतात:
१. औदासिन्य (डिप्रेशन): पुरुषांपेक्षा स्त्रियांना निराशा जास्त जाणवते. हार्मोनल असंतुलन, थायरॉईड डिसऑर्डर सारख्या उदासीनता आणि मुख्य आजारामुळे पुन्हा लठ्ठपणा येतो.
२. आत्मविश्वास कमी होणे : तरुणपणामध्ये जास्त प्रमाण आढळते.
३. खाण्यासंबंधी विकृती: मला बारीक व्हायचे म्हणून संतुलित आहार न घेणे.
कुणीतरी सांगितलय कि फिट माणसे खुश असतात, छान दिसतात, त्यांना पटकन जवळ केलं जाते इत्यादी..मग सुरु होते रेस, अतिव्यायाम, प्रोटीन, खायचे प्रमाण बदलणे – परिणाम – आत्मक्लेश, मी हे करूच शकत नाही हि नकारत्मकता. मग आपण काय करू शकतो? फक्त स्वीकार हा शेवटचा पर्याय नाही. पण हा पॉसिटीव्ह बदल आपल्याला मानसिक रित्या मदत करतो.
१. फोकस बदलतो – वाईट वाटणे बंद झाले कि आपले विचार बदलतात. चांगले प्लांनिंग करायला वेळ भेटतो.
२. कुठलेही टार्गेट लवकर साध्य होण्यासाठी आपले विचार सुंदर व सकारात्मक असले तर हार्डवर्क करायला त्रास होत नाही.
३. आपले कपडे – प्रकार, डिझाईन, पद्धत यामध्ये आपण विविधता आणतो.
४. मानसिक प्रगल्भता येते – कुणी टीका केली तर मोटिवेशन म्हणून बघतो.
५. आयुष्य म्हणजे बाहेरील दिसणे नसून मनाची व बुद्धीची सुंदरता अशी मनाची धारणा होते.
अलीकडील काळात केलेल्या सर्वे नुसार जगभरामध्ये महिला आता आपल्या शरीराबाबत सकारात्मक होताना दिसत आहेत आणि हि खूप चांगली गोष्ट आहे. सुंदरता हि आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, विचारांमधून दिसू लागली की माधुरी दीक्षित किंवा टायगर श्रॉफ ध्यानीमनी पण येणार नाही. एकदा हि सकारात्मकता मनात कायम राहिली तर आपले उद्देश म्हणजेच शरीराची काळजी व्यवस्थित घेता येते व काळजी न करता आयुष्य पण सुखीसमाधानी व्यतीत होते.
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९