थोड्या दिवसापूर्वी मित्रांबरोबर गप्पा मारताना असं जाणवलं की खरंच आनंद कशात आहे. कारण प्रत्येकाचे चेहरे काहीतरी सांगत होते. आपले चेहरे हे कित्येकदा आपलं मन प्रकट करत असतात फक्त तुमचं निरीक्षण तसं हवं. जर कधी बारकाईने पहिले तर असं जाणवेल की काही माणसं आयुष्यात खूप कमी वेळा आनंदी दिसतात तर काही हमेशा खुष. आनंद विकत आणि फुकट दोन्ही प्रकाराद्वारे मिळतो अस असूनसुद्धा आपण कित्येकदा आपल्याला खुष कशात राहायचे तेच समजत नाही.
आपलं मन आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत:
१. एक तर मेंदू मधील केमिकल लोचा (dopamine, oxytocin, serotonin, and endorphins), ज्याने करून आपल्या मेंदूत आनंददायी स्त्राव तयार करत असतात.
२. जवळचे नातेसंबंध, संगती (चांगले असतील असे समजून)
३. नोकरी किंवा भूतकाळ जो त्यांना आवडतो.
४. ज्यांनी इतरांना मदत केलेली असते. त्यांना छान अनुभूती प्राप्त होते.
५. पैशाच्या आणि भौतिक गोष्टींचा आनंद.
६. आवडीचे अन्नपदार्थ व ठराविक फळं. आवडीचे वातावरण.
मानसशास्त्रीय अहवालानुसार उदासीनता आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या दूर केल्यास आनंदात 20% वाढ होईल, तर गरीबी दूर केल्याने आनंदात केवळ 5% वाढ होईल. म्हणजे आपण समजून घ्या की काय महत्वाचे.
आनंदी लोकांना खुप फायदे आहेत जे सर्वसृत आहेत:
१. हृदयविकाराचा झटका – चान्स कमी.
२. कमी कोलेस्ट्रॉलची हमी.
३. तणावाची पातळी कमी.
४.दीर्घ आयुष्य.
५. आपली लवचिकता आणि कल्याणकारी दृष्टी वाढवते.
६. महत्त्वाचे कार्य करण्याची आपल्याला शक्ती आणि उर्जा मिळते.
७. कुटुंब आणि समाजाला चालना देते.
८. व्यवहारात निपुणता.
९. आपलं फुफ्फुस, स्नायू, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या आरोग्यासाठी चांगले.
आनंदी जीवनाचे तोटे तर अजिबात नाहीत तरीपण आपण हे मार्ग न पत्करता दुखी राहतो. त्याबाबत काही मानसिक कारण आहेत जे आपल्याला आनंदी राहण्यापासून रोखत असतात.
१. अविवेकी विचार.(समुपदेशनाने फरक पडतो)
२. नकाराचे भय. (प्रयत्नांती परमेश्वर, सकारात्मक आप्तेष्टांशी बोला )
३. इतर लोकांच्या सांगण्यानुसार जगणे. (कशाला आणि कुणी सांगितले ऐकायला. शांत राहा, करावे मनाचे )
४. अपयशाची भीती. (पैसाच सर्व काही नाही. डिप्रेशन मध्ये जायची गरज नाही, उपचाराला खर्च येतो)
५. पाप आणि गुन्हे. (करूच नका, वादविवाद टाळा, समुपदेशन घ्या)
६. अल्कोहोल आणि ड्रग्स. (कटाक्षाने टाळा, नसेल जमतं तर रिहॅबिलशन / समुपदेशन पर्याय आहे)
७. आपल्यावर केलेली विध्वंसक टीका. (टीका हि आरशासारखी पहा, आपली वाईट गुण काढून टाकण्यास फुकट मदत!)
आनंद फुलपाखरासारखा असतो, त्याचा पाठलाग केला तर तो नेहमीच दूर पळतो, परंतु जर तुम्ही शांतपणे बसलात, विवेकावर, मनावर ताबा ठेवला तर सहजासहजी प्राप्त करू शकता. आज सगळ्यांना माहित आहे आनंद कसा स्वतः जवळ येईल पण आपली तयारी आहे का त्याला उपभोगायची, थांबवून ठेवायची, त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यायची…असेल तर ठरवा आणि मग बघा …
@श्रीकांत कुलांगे
9890420209