राग आणि भावनिक बुद्धिमत्ता
आपल्या आयुष्यात भावनांना केवढं महत्त्व असतं. आयुष्य घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम अनेक वेळा या भावनांमार्फतच होत असतं. बिघडवण्यात रागाला पहिला नंबर द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून रागावणारी अन् त्यामुळे परस्परांशी महिने किंवा वर्षानुवर्षं अबोला धरणारी माणसं किंवा कुटुंबं बघितली की वाटतं, हे रुसवेफुगवे खरंच योग्य कारणांसाठी असतात का? छोटी मोठी कारणं हे दोन कुटुंबांत दुरावा निर्माण …