टिन-एज आणि समस्या
एका शाळेतील ‘न ऐकणाऱ्या’ मुलाची आई वैतागून समुपदेशन घेताना बोलली की, ‘‘ कुजकटपणे बोलणाऱ्या नवऱ्याशी मी एकवेळ जुळवून घेऊ शकते. या मुलापुढे मात्र हात टेकले. त्याच्याशी कसं वागावं तेच कळत नाही.” अशा केसेस आता काउन्सिलिंग सायकोलोजिस्ट कडे पहिल्यापेक्षा जास्त वाढत आहेत. पालकांना मुलांच्या वाढत्या वयातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील समस्यांची जाण असेल, तर त्यांना मुलांना हाताळणे सोपे …